
पुणे : शहरातील रस्ते, सार्वजनिक जागांचे झाडणकाम व्यवस्थित व्हावे, कामगारांनी कुठे झाडले हे तपासता आले पाहिजे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रत्येक कामगाराच्या हातात जीपीएस ट्रॅकिंग बँड बांधण्यात आला. पण काही महिने होताच बॅटरी खराब झाली, बॅटरी चार्ज होत नाही, अशी कारणे देत हे ट्रॅकर कचऱ्यात फेकून दिले आहेत. काम न करता पगार काढण्यासाठी आरोग्य निरीक्षक, मुकादमांनी कर्मचाऱ्यांना फूस लावल्याने हे प्रकार घडत आहेत. तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने यात सुधारणा करणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.