
रेल्वे प्रशासनाने सोमवारी जय्यत तयारी केली होती.ज्यांना प्रवास करायचा आहे,त्यांनाच स्थानकात प्रवेश दिला जात होता.तसेच स्थानकाच्या आवारात दिवसातून निर्जंतुकीकरण केले जात असल्याचे दिसून आले.
पुणे - पुणे रेल्वे स्टेशनवरून सोमवारपासून प्रवासी रेल्वे वाहतुकीला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सहा बिहार, आेडिसा, हैदराबाद, बंगळूरूकडे गाड्या रवाना झाल्या. सुमारे 71 दिवसांनंतर रेल्वे स्थानक प्रवाशांनी गजबजले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
केंद्र सरकारने सोमवारपासून 200 गाड्यांची देशातील विविध स्थानकांवरून वाहतूक सुरू केली आहे. त्यानुसार पुणे रेल्वे स्थानकावरून पुणे - पाटना (दाणापूर) ही एकमेव गाडी रोज रात्री आठ वाजून 55 मिनिटांनी सुटली. मुंबईवरून बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस, ओडीशासाठी कोनार्क एक्स्प्रेस, दिल्लीवरून निजामुद्दीन - गोवा एक्सप्रेस, मुंबई- गदग आदी गाड्या पुणे स्थानकवरून रवाना झाल्या. तसेच गेल्या वीस दिवसांच्या कालावधीत रेल्वेच्या पुणे विभागातून 144 श्रमिक स्पेशल गाड्या रवाना झाल्या. त्यातील 84 गाड्यांची पुणे रेल्वे स्थानकावरून वाहतूक झाली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने सोमवारी जय्यत तयारी केली होती. ज्यांना प्रवास करायचा आहे, त्यांनाच स्थानकात प्रवेश दिला जात होता. तसेच स्थानकाच्या आवारात दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण केले जात असल्याचे दिसून आले. प्रवाशांच्या बॅगाही निर्जंतुकीकरण करण्यात करण्यात येत होत्या.
डेक्कन क्विनचा वाढदिवस
पुणे- मुंबई मार्गावरील डेक्कन क्विनने सोमवारी 91 वर्षांत पदार्पण केले. सध्या ही गाडी लॉकडाउनमुळे मुंबईत आहे. तिच्या आठवणी जपत रेल्वे प्रवासी ग्रूपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी स्थानकाच्या प्रवेद्वारावर प्रवासी, रेल्वे अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत केक कापून डेक्कन क्विनचा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी स्टेशनमास्तर अजय सिंग, स्टेशन उपव्यवस्थापक सुनील ढोबळे उपस्थित होते.