सुट्यांमुळे शनिवारवाडा पर्यटकांनी बहरला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

पुणे - पुणे म्हटलं, की सारसबाग, लालमहाल, पर्वती डोळ्यासमोर येते. पण यातील शनिवारवाड्याचा थाट वेगळाच.... थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा शनिवारवाडा...  सुट्यांच्या हंगामामुळे सध्या पर्यटकांनी गजबजला आहे. 

पुणे - पुणे म्हटलं, की सारसबाग, लालमहाल, पर्वती डोळ्यासमोर येते. पण यातील शनिवारवाड्याचा थाट वेगळाच.... थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा शनिवारवाडा...  सुट्यांच्या हंगामामुळे सध्या पर्यटकांनी गजबजला आहे. 

दिवाळीच्या सुटीत रोज सुमारे वीस ते पंचवीस हजार पर्यटकांनी शनिवारवाड्याला भेट दिली. त्यात काही परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. सध्या दररोज सुमारे चार ते पाच हजार पर्यटक भेट देत आहेत. शालेय सहलींमुळेही शनिवारवाड्यात किलबिलाट वाढला आहे. वाड्याचा मुख्य दरवाजा, कमानी, कारंजे, गणेश दरवाजा, दिल्ली दरवाजा, तोफखाना, सदर, भुयार, महाल यांच्या स्मृती जपण्यासाठी सेल्फी घेणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे.  पर्यटक शहरातील अनेक ठिकाणांना भेटी देत असले, तरी शनिवारवाडा पाहिल्याशिवाय कोणीही परत जात नाही. वाड्याच्या व्यवस्थापनात पुरेशी स्वच्छ आणि स्वच्छतागृहे नसल्याचे आणि अधिकृत गाइडही नसल्यामुळे सुरक्षारक्षकच ‘गाइड’ची भूमिका बजावत असल्याचे काही पर्यटकांनी चर्चा करताना समजले. 

तिकिटांचे दर कमी करावेत. माहिती देण्यासाठी मार्गदर्शक नेमावेत, वाड्याच्या परिसरात सार्वजनिक शौचालये असावीत, महिला सुरक्षारक्षक नेमावेत, माहिती फलक लावावेत.  
- एस.आर. सपकाळ,  पर्यटक, जळगाव. 

बाजीराव मस्तानी चित्रपट पाहिला आणि तेव्हापासून शनिवारवाडा पाहण्याची उत्सुकता होती. दिवाळीच्या सुटीत परिवारासह आवर्जून शनिवारवाडा पाहण्यासाठी आलो आहोत. मात्र, याठिकाणी महिला सुरक्षारक्षक नाहीत. जीर्ण झालेल्या भिंतीवर सुरक्षाजाळ्या बसवाव्यात. 
- अजय यादव, पर्यटक, दिल्ली.

Web Title: crowd of tourists in Shaniwarwada