

श्रीनगर, ता. १६ (पीटीआय) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात गेल्या आठवड्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) चौकीवर झालेल्या हल्ल्यामागील दहशतवाद्यांची ओळख पटविण्यासाठी सुरक्षा दलांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी येथे दिली. ‘‘आमची कारवाई सुरू आहे. मात्र गोपनीयतेच्या कारणास्तव त्याचे तपशील उघड करू शकत नाही,’’ असे जम्मू-काश्मीर विभागाचे सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) संदीप खिरवार यांनी येथे एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
११ नोव्हेंबर रोजी कुलगाममधील मीर बाजारजवळ असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) चौकीवर दोन शस्त्रधारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे तीन जवान जखमी झाले होते.
दरम्यान, हल्लेखोरांपैकी कोणाची ओळख पटली आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना खिरवार म्हणाले, ‘‘आमच्या हाती काही धागेदोरे लागले आहेत. हे धागेदोरे बऱ्यापैकी महत्त्वाचे आहेत.’’ दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या मोहिमा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जखमी जवानाची प्रकृती आता चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.