सीएसआयआर नेटची तारीख बदलली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSIR net exam date changed

PUNE : सीएसआयआर नेटची तारीख बदलली

पुणे : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन (Scientific and industrial research) संस्थेच्या (CSIR) वतीने प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी किंवा संशोधन शिष्यवृत्तीसाठी (Research Scholarship) घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (नेट) तारखा बदलण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावरीलच ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (गेट) या परीक्षेच्या दिवशी आधीच्या तारखा आल्याने हा बदल करण्यात आला आहे. आता २९ जानेवारी, १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान नेटची परीक्षा पार पडणार आहे.

हेही वाचा: ४० हजार विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन; १५ ते १८ वयोगटाचा समावेश

नेट परीक्षेला बसणारे बहुतेक परीक्षार्थी गेट परीक्षेसाठीही पात्र असतात. ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी नेट आणि गेट ची परीक्षा होणार होती. पर्यायाने अनेक परीक्षार्थींना कोणत्या तरी एका परीक्षेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. या संबंधी सकाळ ने दखल घेत वृत्तही प्रसिद्ध केले होते. आता सीएसआयआरच्या वतीने समन्वय साधत नेट परीक्षेच्या या तारखा पुढे ढकलण्यात आली आहे. आता उमेदवारांना दोन्ही परीक्षा देने शक्य झाले आहे.मागील वर्षी सीएसआयआर नेट परीक्षा एकदाही झाली नव्हती त्यामुळे विद्यार्थी हवालदील झाले होते.

परीक्षार्थींची संख्या (२०१९)

- सीएसआयआर नेट : २ लाख ८२ हजार

- गेट : ७ लाख ७९ हजार

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top