

CTET Examination 2026
sakal
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सीटीईटी) आणि जिल्हा परिषद निवडणूका एकाचवेळी आल्या आहेत. त्यामुळे पूर्वनियोजित ‘सीटीईटी’ परीक्षा द्यायची की निवडणुकीचे कर्तव्य बजवावे, या व्यूहचक्रात अडकले आहेत. ‘सीटीईटी’ परीक्षा द्यायची की निवडणुकीची ‘ड्यूटी’ निभवायची, अशा पेचात शिक्षक सापडले आहेत.