मर्यादित आसनांमुळे नाटकांची पाठ

प्रसाद पाठक
रविवार, 3 जून 2018

पुणे - व्यावसायिक, प्रायोगिक रंगभूमीवरील दर्जेदार नाटके नागरिकांना पाहायला मिळावीत, या उद्देशाने मालधक्का येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधण्यात आले; परंतु मर्यादित आसन क्षमता, अस्वच्छता आणि उत्पन्नाची शाश्‍वती नसल्याने नाटक कंपन्यांनी भवनाकडे पाठ फिरविली आहे. त्यातच शेजारच्या दहा गुंठे जागेत भवनाच्या विस्ताराचा प्रस्तावदेखील शासनस्तरावर फेटाळण्यात आला आहे.   

भवनाच्या देखभालीचा खर्च राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांच्या उत्पन्नातून भागवावा लागत आहे. पाच-सहा गुंठे जागेत बांधलेल्या भवनाच्या विस्ताराचा प्रस्ताव यापूर्वी शासन दरबारी पाठवला होता. मात्र तो मान्य झाला नाही, असे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. दरम्यान, या भवनात यूपीएससी, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय आहे. कॉन्फरन्स हॉलदेखील आहे. महार रेजिमेंट व बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन आहे; परंतु भवनाची देखरेख केवळ आठ कर्मचारी करतात. 

महापालिकेच्या भवन रचना विभागातर्फे येथे अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली. मात्र त्याकरिता आवश्‍यक असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम संथ गतीने चालले आहे. त्यामुळे पार्किंगमध्ये बांधकामाचा राडारोडा पडून असतो. 

येथील ग्रंथालयाचे ग्रंथपाल शैलेंद्र तुरवणकर म्हणाले, ‘‘नाट्यगृहाची आसनक्षमता मर्यादित आहे. तिक्रीट विक्री झाली नाही तर नुकसान होईल, म्हणून नाटक कंपन्या फिरकतच नाहीत. ठेकेदार नेमले तरीही भवनाची स्वच्छता नसते. ग्रंथालयात विद्यार्थ्यांना बसायला पुरेशा खुर्च्या नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी एकच कुलर आहे.’’

आसनक्षमता मर्यादित असलेल्या नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग करणे नाटककारांना परवडत नसावे. कारण रंगमंदिराचा दर, तिकीट विक्री, कलाकारांचे मानधन या साऱ्या बाबींचाही विचार करावा लागतो. या ठिकाणी सातत्याने कार्यक्रम होण्याकरिता प्रयत्न झाले, तर प्रेक्षकांची पावलेही नाट्यगृहांकडे वळतील. 
- राहुल देशपांडे, गायक- संगीतकार 

नाट्यगृह कोणत्या परिसरात आहे, याचा विचार करून नाटक बघायला जायचे की नाही, असे काही प्रेक्षक ठरवतात. त्यामुळे काही नाट्यगृहांमध्येच प्रेक्षकांची गर्दी दिसते. नाटक बघायची इच्छा असली तरीही पसंतीचे नाट्यगृह नसते म्हणून प्रेक्षक नाटकाला जाणे टाळतो.
- संदीप चौहान, प्रेक्षक

Web Title: cultural auditorim drama limited seats