Kutumb Kirtan Drama : ‘कुटुंब किर्रतन’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खळखळून हसविणारे अन्‌ नाटकातून प्रबोधनही; १६, १८ एप्रिल, १ मे रोजी पुन्हा प्रयोग
kutumb kirtan drama
kutumb kirtan dramasakal
Updated on

पुणे - रसिकांना खळखळून हसविणारे आणि प्रबोधनही करणारे ‘कुटुंब किर्रतन’ हे धमाल नाटक रंगभूमीवर आले आहे. हे नाटक ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत करत असून ‘रांजेकर रिअल्टी’ हे सहप्रायोजक आहेत. ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ हे फायनान्स पार्टनर असून, ‘द नेचर-मुकाईवाडी’ सहयोगी प्रायोजक आहेत.

संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि अमेय दक्षिणदास दिग्दर्शित या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, तन्वी मुंडले आणि अमोल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याचे कथासूत्र विनोद रत्ना यांचे असून निर्मिती गौरी प्रशांत दामले यांची आहे.

या नाटकाच्या निमित्ताने संकर्षण व वंदना गुप्ते प्रथमच रंगभूमीवर एकत्र काम करत असून तन्वी आणि अमेय यांचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे.

महाराष्ट्राला नाटकांच्या समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेला आहे. याच परंपरेत भर घालणारे संकर्षण कऱ्हाडे लिखित ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचे सहप्रायोजक होण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.

- अनिरुद्ध रांजेकर, पार्टनर, रांजेकर रिअल्टी

‘कुटुंब किर्रतन’ नाटकाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करणारे हे नाटक विनोदिरित्या मांडलं गेलं आहे. या उपक्रमासाठी सहयोगी प्रायोजक होऊन आनंद होत आहे.

- सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

नाटकातील सर्व कलाकारांनी प्राण ओतून अभिनय केला आहे. प्रेक्षक ज्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत त्यातूनच कथालेखन उत्तमरीत्या केल्याची शाश्वती मिळते.

- सुशीलकुमार देशमुख, चेअरमन, ‘द नेचर - मुकाईवाडी’

पुढील प्रयोगांचे वेळापत्रक

बुधवार, ता. १६ एप्रिल २०२५

वेळ : सायं. ५ वाजता

स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

शुक्रवार, ता. १८ एप्रिल २०२५

वेळ : दु. १२.३० वाजता

स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर

गुरुवार, ता. १ मे २०२५

वेळ : दु. १ वाजता

स्थळ : रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

तिकिटांबाबत...

‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाच्या १६ आणि १८ एप्रिलच्या प्रयोगांची तिकिटे नाट्यगृहांवर उपलब्ध आहेत. तसेच, bookmyshow.com आणि ticketalay.com या संकेतस्थळांवर देखील तिकिटे उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com