
पुणे : ‘‘जगातील साऱ्या संस्कृती या नदीच्या काठी निर्माण झाल्या. नदी जशी प्रवाही असते, तशीच संस्कृतीदेखील प्रवाही असणे आवश्यक आहे. सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी ज्या माध्यमातून संस्कृती वाहत आली, ती माध्यमे जिवंत ठेवणे गरजेचे आहे,’’ असे मत माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी व्यक्त केले.