The customers of State Bank of India affected due pune rains
The customers of State Bank of India affected due pune rains

Pune Rains : असा बसला पावसाचा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना फटका

Published on

Pune Rains : पुणे : कालच्या मुसळधार पावसाचा फटका आज गुरवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना बसला आहे. आज सकाळपासून भरत नाट्य मंदिराशेजारील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुणे मुख्य शाखेत अनेक व्यवहार बंद आहेत.

बँकेच्या लॉकरच्या चाव्या ज्या अधिकाऱ्याकडे असतात धायरीला राहात असल्याने आणि तेथून सदाशिव पेठेतील शाखेमध्ये पोहचणे अशक्य होते. त्यामुळे आज येऊ शकत नसल्याचे असे बँक मॅनेजरने सांगितले. डिमांड ड्राफ्ट आणि बँकर्स चेकची स्टेशनरी या लॉकरमध्ये असल्याने कॅशचे व्यवहार सुध्दा आलेल्या कॅशमधून केल्याचे त्यांनी सकाळच्या वाचकांना सांगितले.

कालच्या पावसाचा फटका आज स्टेट बँकेच्या ग्राहकांना असाही बसू शकतो याची कल्पनाही कुणी करू शकत नाही.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com