
खडकवासला : खडकवासला येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा (सीडब्ल्यूपीआरएस) १०९ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १४) आहे. या दिवशी हे केंद्र सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी खुले असणार आहे. येथील विविध प्रकल्पांवर आधारित मॉडेल पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.