
पुणे : खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री मोठी कारवाई करत छापा टाकला. प्राइड आयकॉन’ इमारतीतील ‘मॅग्नेटल बीपीएस ॲण्ड कन्सल्टन्सी एलएलपी’ या नावाने चालवले जात असलेले हे कॉल सेंटर अमेरिकेतील नागरिकांना ‘डिजिटल अटक’ करण्याची भीती दाखवून फसवणूक करत होते. या कारवाईत सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, सध्या पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे.