Pune Cyber Fraud: पुणेकरांना शेअर बाजाराचे आमिष दाखवून ९.३१ कोटींचा गंडा; सायबर चोरट्यांनी एप्रिलमध्ये २४ जणांना बनवले ‘एप्रिल फूल’

शेअर बाजारातील खोट्या जाहिराती, बनावट ट्रेडिंग ॲप आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या आमिषाने पुणेकरांकडून एप्रिलमध्ये तब्बल ९.३१ कोटींची लूट; १८ ते ७१ वयोगटातील २४ जणांना फसवणुकीचा फटका
Cyber Fraud Alert: Pune Citizens Lose ₹9.31 Crore to Stock Market Scams in April

Cyber Fraud Alert: Pune Citizens Lose ₹9.31 Crore to Stock Market Scams in April

sakal
Updated on

पुणे : झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी पुणेकरांनी एकाच महिन्यात ९ कोटी ३१ लाख रुपये गमावले. केवळ शेअर बाजारातील नफ्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एप्रिल महिन्यात २४ नागरिकांना ‘एप्रिल फूल’ बनवले असून, यात अठरा वर्षांच्या तरुणासह एकाहत्तर वर्षांच्या वृद्धालाही गंडा घातल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com