Cyber Fraud : संगणक अभियंता तरुणीची १४ लाख रुपयांची फसवणूक
Online Job Scam : पुण्यात संगणक अभियंता तरुणीची ऑनलाईन नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी १४ लाख रुपयांची फसवणूक केली असून, गुन्हा आंबेगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
पुणे : ऑनलाइन पद्धतीने काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी संगणक अभियंता तरुणीची १४लाख रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.