Cyber Fraud: सायबर चोरट्यांकडून पुण्यात ८२ लाखांची फसवणूक, चौघांवर गुन्हा दाखल
Online Scam: सायबर चोरट्यांनी पुण्यातील चौघांची ८२ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केली. वेगवेगळ्या घटनांमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत.
पुणे : सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत आमिष दाखवून चौघांची ८२ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.