देवस्थानच्या बनावट संकेतस्थळाद्वारे महिलेची ११ लाखांची फसवणूक

देवस्थानच्या बनावट संकेतस्थळाद्वारे 
महिलेची ११ लाखांची फसवणूक
Published on: 

पुणे, ता. ३१ ः मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध देवस्थानच्या नावे बनावट संकेतस्थळ तयार करून सायबर चोरट्यांनी एका भाविक महिलेची ११ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
देवस्थानच्या संकेतस्थळावरून निवासाची सुविधा मिळविण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्याची माहिती मिळविली आणि त्यानंतर खात्यातून रक्कम परस्पर वळविली. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने लोहगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला, त्यांचे पती आणि कुटुंबीय दिवाळीच्या सुटीनिमित्त मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध देवस्थानात दर्शनासाठी जाणार होते. त्यासाठी त्यांनी संबंधित देवस्थानच्या संकेतस्थळाची माहिती घेण्यास सुरुवात केली. देवस्थानच्या संकेतस्थळाची पाहणी करताना त्यांना महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध देवस्थानच्या नावाचे संकेतस्थळ आढळले. या संकेतस्थळावर भाविकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध असल्याचे नमूद केले होते. विनामूल्य निवासासाठी नावनोंदणी करण्याच्या उद्देशाने महिलेने संकेतस्थळावरून माहिती घेतली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. निवासासाठी नावनोंदणी करण्याकरिता काही शुल्क भरावे लागेल, असे सांगून त्यांनी महिलेची बँक खात्याशी संबंधित माहिती घेतली. त्यानंतर या माहितीचा गैरवापर करून महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ११ लाख २३ हजार रुपये काढून घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.