Pune Cyber Crime
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पुण्यातील वेगवेगळ्या भागांत कोट्यवधींची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. वाघोली, मांजरी आणि लोगहाव परिसरात ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.