

Cyber Crime
sakal
पुणे - सायबर गुन्हेगारांच्या आंतरराज्य टोळीला स्वतःचे बँक खाते वापरण्यास देऊन एक कोटी ३२ लाख ७९ हजार रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहारांना मदत केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी हडपसर पोलिसांनी संबंधित बँक खातेदाराविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिस हवालदार माधुरी डोके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बँकेच्या एका खातेदाराने त्याचे खाते सायबर गुन्हेगारांना पुरवले होते. या खात्याचा वापर करून सायबर गुन्हेगारांनी चौघांची एक कोटी ३२ लाखांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली.