
पुण्यातील खराडी परिसरातील प्राईड आयकॉन इमारतीच्या 9व्या मजल्यावर पुणे सायबर पोलिसांनी मध्यरात्री मोठी छापेमारी करत बनावट कॉल सेंटर उध्वस्त केले. या कारवाईत ‘डिजिटल अरेस्ट’ नावाखाली अमेरिकन नागरिकांना फसवणाऱ्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी 100 हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून, यामध्ये अनेक तरुणींचा समावेश आहे. तसेच, 41 मोबाईल फोन, 61 लॅपटॉप आणि इतर महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.