

पिंपरी, ता. १८ : नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत या गणेशोत्सवात चिंचवड परिसरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये सायबर पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधून, सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याच्या स्नेहल तिताडे, नारायणी पाटील आणि संगीता पुरी यांनी नवतरुण मंडळ तसेच गांधी पेठ तालीम मित्र मंडळ येथे नागरिकांशी संवाद साधत सायबर सुरक्षेबाबत सविस्तर माहिती दिली.
अनोळखी व्यक्तींकडून येणारे संदेश, फोन, संशयास्पद लिंक, बनावट संकेतस्थळे तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये, कोणतीही वैयक्तिक, बँकिंग किंवा गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, तसेच अनोळखी ॲप किंवा फाइल मोबाइलमध्ये डाऊनलोड करू नये, असे आवाहन करण्यात आले.
सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.