Pune : पुणे शहरात सायबर चोरट्यांचा धुडगूस, एका व्हिडिओला लाइक करण्यासाठी ५० रुपये

‘‘हाय, मी रेश्मा... डायमंड एलिट कंपनीत रिक्रुटर आहे. आमची कंपनी इन्स्टाग्रामवरील जाहिरातींमध्ये काम करते. तुम्हाला फक्त व्हिडिओला लाइक करायचे आहे. प्रत्येक व्हिडिओसाठी तुम्हाला ५० रुपये देऊ.
cyber thieves in Pune city who are charging rs 50 to like a video
cyber thieves in Pune city who are charging rs 50 to like a videoSakal

Pune News : ‘‘हाय, मी रेश्मा... डायमंड एलिट कंपनीत रिक्रुटर आहे. आमची कंपनी इन्स्टाग्रामवरील जाहिरातींमध्ये काम करते. तुम्हाला फक्त व्हिडिओला लाइक करायचे आहे. प्रत्येक व्हिडिओसाठी तुम्हाला ५० रुपये देऊ.

मी तुम्हाला तीन व्हिडिओ पाठवीन. तुम्ही लाइक करून स्क्रीनशॉट पाठवा. तीन व्हिडिओंसाठी दीडशे रुपये मिळतील. दिवसाला दोन ते अडीच हजार मिळू शकतात. स्वारस्य असल्यास कळवा,’’ असा संदेश मोबाईलवर आल्यास सावध व्हा. अशा प्रकारे विविध आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

मगरपट्टा परिसरातील अय्यर यांच्या मोबाईलवर संदेश आला. परदेशातील मोबाईल क्रमांक किंवा वेगळ्याच क्रमांकाच्या मोबाईलवरून अशा प्रकारचे संदेश अनेक नागरिकांना मोबाईलवर येत आहेत. अय्यर यांनाही असाच ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याबाबत संदेश आला.

चोरट्यांनी त्यांना टेलिग्रामवर लिंक पाठवली. टास्क पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा तीन हजार ७०० रुपये दिले. त्यानंतर चोरट्यांनी अय्यर यांना दोन लाख ६० हजार रुपये बॅंक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार अय्यर यांनी चोरट्यांनी दिलेल्या खात्यात पैसे भरले. परंतु परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अय्यर यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

वकिलाची १० लाख रुपयांची फसवणूक -

शेअर मार्केट ट्रेडिंग आणि आयपीओमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका वकिलाला दहा लाख रुपयांना गंडा घातला. याबाबत सॅलिसबरी पार्कमधील योगेश यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी ऑनलाइन वर्ग घेउन त्यांना आयपीओत पैसे गुंतवणूक करण्याचे फायदे सांगितले.

त्यानंतर लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार योगेश यांनी दहा लाख रुपये गुंतवणूक केली. परंतु त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलिस ठाणे गाठले.

‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून फसवणूक-

खराडी येथील जसदेव यांनाही टेलिग्रामवर ‘वर्क फ्रॉम होम’चा संदेश आला. ऑनलाइन जॉब आणि क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार जसदेव यांनी आरोपींनी दिलेल्या बॅंक खात्यात साडेसात लाख रुपये जमा केले. परंतु मोबदल्यात पैसे न देता फसवणूक केली. याबाबत जसदेव यांनी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

व्यावसायिकाची फसवणूक -

अन्य एका घटनेत ॲम्युनिशन फॅक्टरीचे अधिकारी असल्याचे सांगून चोरट्यांनी बाणेर येथील व्यावसायिकाची चार लाख १८ हजार रुपयांची फसवणूक केली. कुलिंग टॉवरचे काही भाग खरेदी करायचे आहे, असा संदेश मोबाईलवर पाठवला. त्यानंतर जैन यांनी पैसे भरले. परंतु फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

वीज बिलाच्या बहाण्याने फसवणूक

कर्वेनगर येथील निशा नावाच्या महिलेला मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा संदेश आला. तुमचे वीज बिल अद्ययावत करण्याची बतावणी करून ते अपलोड करण्यास सांगितले. त्यानंतर दोन लाख ५४ हजार रुपये ऑनलाइन घेउन फसवणूक केली. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com