पुणे - सायबर चोरट्यांनी घोरपडे पेठेतील महिलेसह पाषाणमधील एका व्यक्तीची ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत मुंढवा आणि बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..याबाबत घोरपडे पेठेतील एका ३७ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांनी या महिलेस शेअर बाजारात चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेकडून वेळोवेळी २३ लाख ५० हजार रुपये बॅंक खात्यात जमा करण्यास भाग पाडले.परंतु परतावा मागितल्यानंतर पैसे दिले नाहीत. हा प्रकार डिसेंबर ते जानेवारीदरम्यान घडला. याबाबत महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निळकंठ जगताप करीत आहेत..अन्य एका घटनेत सायबर चोरट्यांनी पाषाणमधील ४४ वर्षीय व्यक्तीला १७ लाख ७४ हजार रुपयांना गंडा घातला. चोरट्यांनी त्यांना १७ सप्टेंबर रोजी मोबाईलवर लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असा संदेश पाठविला..त्यानंतर चोरट्यांनी सुरुवातीला त्यांना परताव्यापोटी काही रक्कम देवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीने वेळोवेळी १७ लाख ७४ हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु त्यावर कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.