वयाची साठी ओलांडलेल्या दोन वीरांची सायकल मुशाफिरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

मंदिरे व काही विशिष्ट इमारतींचे स्थापत्य नजरेत भरत होते. या संपूर्ण प्रवासात मदत करणारी माणसे सातत्याने भेटत राहिली. सागरी किनाऱ्याचे वैविध्य अनुभवले. विवेकानंद यांच्या एकशे छप्पनाव्या जयंतीदिनी कन्याकुमारी येथे पोचण्याचे नियोजन केले होते. ते पार पडल्याचा आनंद अविस्मरणीय आहे.
- विवेक दामले, सायकलस्वार

पुणे - पुणे ते कन्याकुमारी दरम्यानचे १ हजार ५३३ किलोमीटर अंतर तेरा दिवसांत पार करण्याचा ध्यास वयाची साठी ओलांडलेल्या संजय कट्टी व विवेक दामले या दोघा साहसी मुशाफिरांनी घेतला. नियोजनबद्ध मार्गक्रमण करत ही मोहीम त्यांनी फत्ते केली. याबद्दल अनुभवकथनाची पर्वणी त्यांनी नुकतीच रसिकांना दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधी महाविद्यालयाजवळच्या दामले हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात कट्टी व दामले यांनी छोट्या पडद्यावर चित्रे दाखवीत आपला प्रवास उलगडला. 

कट्टी म्हणाले, ‘‘महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या राज्यांमधून मजल दरमजल पुढे जाताना निसर्गाचे रम्य दर्शन घडत होते. पहाटे कानांवर पडणारे पक्ष्यांचे आवाज ऐकत राहावेसे वाटायचे. घाटांमधून सूर्योदय व सूर्यास्त अनुभवला. कात्रज, खंबाटकी व तवंदी हे अवघड घाट पार केल्यावर समाधान  वाटले.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cycle journey pune to kanyakumari by two old man