esakal | कर्करोगाच्या रुग्णांना ‘सायजेनिका’चा आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Cygenica

कर्करोगाच्या रुग्णांना ‘सायजेनिका’चा आधार

sakal_logo
By
सनील गाडेकर

पुणे - कर्करोगाच्या रुग्णांत (Cancer Patient) चांगल्या आणि बाधा झालेल्या पेशी कोणत्या आहेत, यातील फरक सध्याची उपचार पद्धती (Treatment Process) करीत नाही. त्यामुळे केमोथेरपीचे कधी कधी दुष्परिणामही होतात. ते रुग्णाला त्रासदायक असतात व त्यातून त्याचे आयुष्यही कमी होण्याची शक्यता असते. मात्र, या रुग्णांसाठी ‘सायजेनिका’ (CyGgenica) या स्टार्टअपने शोधलेले ‘मॉलिक्‍युलर नॅनो मशिन’ दिलासा देणारे आहे. (Cygenica Support for Cancer Patients)

‘डब्ल्यूएचओ’च्या अहवालानुसार दर १५ भारतीयांपैकी एकाचा कर्करोगाने मृत्यू होईल. २०१८ साली केलेल्या संशोधनातून हा आकडा पुढे आला आहे. स्तन, तोंड, गर्भाशय, फुफ्फुस, पोट आणि मलाशयाच्या कर्करोगाचे रुग्ण सर्वाधिक असतात. या रुग्णांसाठी सायजेनिका या स्टार्टअपने ‘मॉलिक्‍युलर नॅनो मशिन’ची निर्मिती केली आहे. या स्टार्टअपचे मूळ तंत्रज्ञान ‘युनिव्हर्सल स्लाइडिंग गेटवे’ (यूएसजी) आहे. जे कर्करोगावरील औषधे अचूकपणे बाधित पेशींवर पोहचवते. संगणकात यूएसबी असतो, त्याप्रमाणे यूएसजी जिवंत पेशींसाठी जैविक माहिती हस्तांतर करते. डॉ. नुसरत संघमित्रा यांनी भुवनेश्‍वरमध्ये या स्टार्टअपची सुरुवात केली. ज्याचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांनो, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मुद्रांक शुल्क देऊ नका

अशी आहे उपचार पद्धती ...

‘सायजेनिका’चे तंत्रज्ञान हे कोणत्याही संगणकावर वापरता येणाऱ्या यूएसबी ड्राइव्हसारखे आहे. ते एखाद्या नॅनो मशिनप्रमाणे वापरून औषध अपेक्षित ठिकाणी नेमकेपणे आणि इतर कशालाही धक्का न लावता पोहचवता येते. त्यामुळे या उपचारांद्वारे रुग्णांवर होणारे दुष्परिणाम कमी होतात.

वडिलांना झाला होता आजार

डॉ. संघमित्रा या पीएच.डी. करीत असताना त्यांच्या वडिलांना कर्करोग असल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान त्यांच्या वडिलांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे कर्करोगाची औषधे अधिक सुरक्षित आणि रुग्णाला बरा करणारा चांगला मार्ग ठरावा, यासाठी त्यांनी काम सुरू केले. त्यातूनच या स्टार्टअपची सुरवात झाली.

पेशींना इजा न करता किंवा त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण न करता कर्करोगावरील जनुकीय औषधोपचार करणे हे औषधनिर्मिती उद्योगापुढील एक मोठे आव्हान आहे. कर्करोग हा एकमेव आजार नाही, कारण त्याच्या उपचारामुळे आणि

त्याच्याशी संबंधित दुष्परिणामांमुळे इतर रोग उद्‌भवतात. यामुळे आम्ही डोस आणि साइड इफेक्ट कमी करण्याच्या उद्देशाने काम करीत आहोत.

- डॉ. नुसरत संघमित्रा, सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सायजेनिका

loading image