दादासो विठोबा मोटे सर यांचे आटपाडी पंचायत समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल तनाळी ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार
UPR26B07515
पंढरपूर : पंचायत समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल दादासाहेब मोटे यांचा सत्कार करताना ग्रामस्थ.
---
पं.स. सदस्य मोटे यांचा
तनाळी ग्रामस्थांतर्फे सत्कार
पंढरपूर, ता. २१ : तनाळी (ता. पंढरपूर) येथे दादासाहेब मोटे यांची आटपाडी पंचायत समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ते माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून, २०१० ते २०१५ या कालावधीत बोंबेवाडी (ता. आटपाडी) येथील सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या काळात मनरेगा योजनेतून गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली होती. ते माडगुळे गणातून विजयी झाले आहेत.
याप्रसंगी रत्नाकर महाराज मठाचे मठाधिपती शिवाजी महाराज, माजी सरपंच दगडू मोटे, माजी सरपंच नाना शिराम, तंटामुक्ती अध्यक्ष श्रीरंग लवटे, विद्यमान सरपंच समाधान मोटे, उपसरपंच म्हाळाप्पा मासाळ, ग्रामपंचायत सदस्य तसेच मुक्तापा शिराम, महादेव शिराम, अप्पा बिरू शिराम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णुपंत गावडे यांनी केले. आभार प्रदर्शन सुधाकर मोटे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

