दगडूशेठ गणपतीला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’

धार्मिक कार्यक्रमांनी गणेशभक्तांतर्फे करण्यात येणाऱ्या अभिषेक व पूजा-अर्चनेप्रमाणे शुक्रवारी दगडूशेठ गणपती बाप्पांना चक्क सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी महाभिषेक केला.
Dagdusheth Ganpati
Dagdusheth GanpatiSakal
Summary

धार्मिक कार्यक्रमांनी गणेशभक्तांतर्फे करण्यात येणाऱ्या अभिषेक व पूजा-अर्चनेप्रमाणे शुक्रवारी दगडूशेठ गणपती बाप्पांना चक्क सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी महाभिषेक केला.

पुणे - धार्मिक कार्यक्रमांनी गणेशभक्तांतर्फे करण्यात येणाऱ्या अभिषेक (Abhishek) व पूजा-अर्चनेप्रमाणे शुक्रवारी दगडूशेठ गणपती (Dagdusheth Ganpati) बाप्पांना चक्क सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी (Sun Rays) महाभिषेक (Mahabhishek) केला. गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रींच्या मूर्तीवर (Idol) पडली आणि जय गणेश...जय गणेशचा जयघोष झाला.

दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रींच्या मूर्तीवर पडतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शुक्रवारी सकाळी भाविकांनी हा सोहळा अनुभवला. सकाळी ८ वाजून २५ मिनिटे ते ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. श्रींच्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या चांदीच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणांनी स्पर्श केला.

Dagdusheth Ganpati
गृहप्रकल्पातील प्रत्येक सदनिकाधारकाला मिळणार प्रॉपर्टी कार्ड

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, गेले तीन दिवस दररोज सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडत आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने ही किरणे मूर्तीवर पडतात. मंदिराची रचना पूर्वाभिमुख व उंच असल्यामुळे गाभाऱ्यात सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश होतो. माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा दरवर्षी अनुभवायला मिळतो. त्यामुळे भाविकांना हा सोहळा गणेश जयंतीनंतर एका आठवड्यामध्येच अनुभवता आला. हा किरणोत्सव सोहळा भाविकांना आणखी एक-दोन दिवस अनुभवता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com