Ganeshotsav Decoration Result : 'दगडूशेठ'च्या स्पर्धेत शहरातील १०४ गणेश मंडळांना पुरस्कार जाहीर

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या राष्ट्रीय गणेशोत्सव सजावट स्पर्धेत शहरातील एकूण १०४ गणेश मंडळांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
Ganpati Decoration
Ganpati Decorationesakal

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या राष्ट्रीय गणेशोत्सव सजावट स्पर्धेत शहरातील एकूण १०४ गणेश मंडळांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

या पुरस्कारांसाठी शहरातील पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य उत्तर आणि मध्य दक्षिण असे सहा विभाग करण्यात आले होते. या सर्व विभागांतून विभागनिहाय अनुक्रमे पहिल्या तीन गणेश मंडळांची या विशेष पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. याशिवाय विविध विषयांवरील देखाव्यासाठीही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

विभागनिहाय विजेते मंडळे :-

पश्चिम विभाग :-

संगम तरुण मंडळ (प्रथम), विनायक नवयुग मित्र मंडळ (द्वितीय), श्रीमंत आझाद मित्र मंडळ (तृतीय), काल्पनिक देखावे - त्रिदल गणेश मंडळ ट्रस्ट कोथरुड. सजीव देखावे - संयुक्त आझादनगर मंडळ (प्रथम), एकी तरुण मंडळ (द्वितीय), समाजसुधारक हिंदुस्थानी मित्र मंडळ ट्रस्ट, अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (तृतीय - विभागून) धार्मिक व पौराणिक देखावे - परोपकार मित्र मंडळ (प्रथम), आनंदनगर पार्क मित्र मंडळ (द्वितीय), श्रीकृष्ण मित्र मंडळ डेक्कन, तानाजी तरुण मंडळ (तृतीय - विभागून). सामाजिक कार्य - भैरवनाथ मित्र मंडळ औंध गाव (प्रथम), नवजवान मित्र मंडळ कोथरुड (द्वितीय), बाल तरुण मंडळ (तृतीय). ऐतिहासिक - आराधना स्पोटर्स क्लब ट्रस्ट, पांडवनगर.

पूर्व विभाग :-

अखिल गणेशबाग मित्र मंडळ (प्रथम), नवरंग मित्र मंडळ (द्वितीय), जय जवान मित्र मंडळ (तृतीय). काल्पनिक देखावे - अमर मित्र मंडळ (प्रथम), नवयुग मित्र मंडळ (द्वितीय). ऐतिहासिक - हनुमान मित्र मंडळ वानवडी.

उत्तर विभाग :-

नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट (प्रथम), श्री अष्टविनायक मित्र मंडळ (द्वितीय), दर्शक तरुण मंडळ येरवडा (तृतीय), सजीव देखावे - दि नॅशनल यंग क्लब खडकी (प्रथम), गवळीवाडा तरुण मंडळ खडकी बाजार (द्वितीय), विकास तरुण मंडळ (तृतीय), सामाजिक देखावे - आदर्श तरुण मंडळ (प्रथम), जनतानगर मित्र मंडळ (द्वितीय).

दक्षिण विभाग :-

उदय मित्र मंडळ (प्रथम), हनुमान आझाद मंडळ ट्रस्ट (द्वितीय), उंब-या गणपती मित्र मंडळ धायरी (तृतीय). सामाजिक देखावे - कै.मिनू मेहता सहकारी मित्र मंडळ (प्रथम), साई मित्र मंडळ आंबेगाव पठार (द्वितीय), जय महाराष्ट्र मित्र मम्डळ धनकवडी (तृतीय). काल्पनिक देखावे - अखिल लक्ष्मीनगर रहिवासी संघ (प्रथम), पंचरत्नेश्वर मित्र मंडळ ट्रस्ट (द्वितीय), एकता मित्र मंडळ ट्रस्ट अरण्येश्वर (तृतीय).

मध्य (उत्तर) विभाग :-

अष्टविनायक मित्र मंडळ (प्रथम), शनिवार मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (द्वितीय), श्री सुंदर गणपती मित्र मंडळ (तृतीय). सामाजिक देखावे - श्रीराम अभिमन्यू मंडळ ट्रस्ट (प्रथम), व्यवहार आळी मित्र मंडळ चौक (द्वितीय), श्री संभाजी मित्र मंडळ (तृतीय). सजीव देखावे - गोसावीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ (प्रथम), जय जवान समता मित्र मंडळ (द्वितीय), विधायक मित्र मंडळ (तृतीय). काल्पनिक देखावे - श्री गजानन मित्र मंडळ (प्रथम), शिवांजली मंडळ (द्वितीय), पद्मशाली सम्राट मित्र मंडळ (तृतीय). ऐतिहासिक देखावे - फणी आळी तालीम ट्रस्ट (प्रथम), नव भारत सेवक मंडळ (द्वितीय).

मध्य (दक्षिण) विभाग :-

वीर शिवराज मित्र मंडळ (प्रथम), अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (द्वितीय), अकरा मारुती कोपरा मित्र मंडळ (तृतीय). सजीव देखावे - वीर हनुमान तरुण मंडळ (प्रथम), होनाजी तरुण मंडळ (द्वितीय), ओम हरिहरेश्वर मित्र मंडळ (तृतीय). उत्तेजनार्थ - शिवतेज मित्र मंडळ (प्रथम). सामाजिक - हिंद माता तरुण मंडळ (प्रथम), अनंत मित्र मंडळ (द्वितीय), श्री शिवाजी चौक मित्र मंडळ (तृतीय). धार्मिक/पौराणिक देखावे - गणेश मित्र मंडळ चिंचेची तालीम.

श्री गणेशोत्सव विशेष पारितोषिक :-

अरण्येश्वर मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, हिंद तरुण मंडळ ट्रस्ट, आदर्श मित्र मंडळ (जय गणेश भूषण पुरस्कार प्राप्त मंडळे).

महोत्सवी वर्ष असलेली गणेश मंडळे :-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ पुणे विद्यापीठ, १५ आॅगस्ट चौक मित्र मंडळ (दोन्ही ७५ वर्षे), जय जवान मित्र मंडळ, अखिल नाना पेठ समझोता मित्र मंडळ (दोन्ही ५० वर्षे), विनायक मित्र मंडळ, मौर्य गार्डन मित्र मंडळ (दोन्ही २५ वर्षे)

शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य करणारी मंडळे :-

श्री काळभैरवनाथ तरुण मंडळ, श्री पोटसुळ्या मारुती मंडळ, साईनाथ मित्र मंडळ आनंदनगर.

शालेय विभाग (पुणे शहर परिसर) :-

न्यू इंग्लिश कूल रमणबाग (प्रथम), नवीन मराठी शाळा (द्वितीय), मूक बधीर शिक्षण विभाग आपटे विद्यालय परिसर (तृतीय), गोळवलकर माध्यमिक विद्यालय, सुंदराबाई राठी हायस्कूल, वा. रा. घोलप विद्यालय, अरण्येश्वर माध्यमिक विद्यालय (उत्तेजनार्थ).

सांस्कृतिक कार्य मंडळे -

श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट (प्रथम), लोकमान्य टिळक प्रस्थापित प्रथम गणपती ट्रस्ट (द्वितीय), अमर मित्र मंडळ (तृतीय)

वैज्ञानिक देखावे -

शिवराज मित्र मंडळ (प्रथम), नवभारत मित्र मंडळ (द्वितीय), बाल मित्र मंडळ - अथर्व बाल मित्र मंडळ, श्रीराम बाल मित्र मंडळ (तृतीय)

सोसायटी गणेश मंडळ -

श्री गणेश मित्र मंडळ घोले रोड (प्रथम), स्वस्तिश्री गृहरचना संस्था गणेशनगर (द्वितीय), सदाशिव सहकारी गृहरचना संस्था आणि सरीताविहार गृहरचना संस्था सिंहगड रस्ता (तृतीय - विभागून), शिवालय गृहरचना संस्था, बी. यू. भंडारी गृहरचना संस्था (उत्तेजनार्थ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com