
पुणे : ‘गोविंदा आला रे’, ‘बोल बजरंग बली की जय’ अशा जयघोषात रचले जाणारे थर... त्यावर सरसर चढणारे गोविंदा... डीजे अन् ढोल-ताशांचा निनाद आणि त्यावर थिरकणारे पुणेकर... अशा उत्साही वातावरणात पुण्यात दहीहंडी उत्सवाचा थरार अनुभवण्यास मिळाला. सहा ते सात थर रचून गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडल्याचा चित्तथरारक क्षण अनुभवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. एलईडी स्क्रीन्सचा वापर, ढोल-ताशा पथकांचे वाढलेले प्रमाण आणि देखाव्यांची रेलचेल, हे यंदाच्या उत्सवाचे वेगळेपण ठरले.