Pune Dahihandi Celebration : ...दहीहंडी उत्सवाच्या सोहळ्यात अवघे पुणेकर न्हाऊन निघाले!

मजबुत पकड, तितकीच चपळता, जिंकण्याच्या जिद्दीने पेटलेल्या बाल गोविंदाचे डोके थेट दहीहंडीला भिडले अन्‌ लाखो पुणेकरांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडले.
Pune Dahihandi Celebration
Pune Dahihandi Celebrationsakal
Updated on

पुणे - रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या धारांमध्ये चिंब भिजत बराचवेळ गाण्यांवर थिरकणारे हजारो तरूण 'त्या' एका क्षणाला थांबले. 'गोविंदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय'चा जयघोष करत पथकांनी कडक सलामी दिली. त्यानंतर आला तो, श्‍वास रोखून धरणारा क्षण. एकावर एक असे गोविंदा पथकांचे सहा ते सात थर चढू लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com