दहिवडी कॉलेज, दहिवडी मध्ये क्रीडा महोत्सव २०२५-२६ उत्साहात संपन्न

दहिवडी कॉलेज, दहिवडी मध्ये क्रीडा महोत्सव २०२५-२६ उत्साहात संपन्न

Published on

दहिवडी कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात
दहिवडी, ता. ५ : रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज, दहिवडीमध्ये आयोजित करण्यात आलेला क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित या महोत्सवात विद्यार्थी- विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महोत्सवाची सुरुवात मॅरेथॉन स्पर्धेने झाली. त्यानंतर क्रिकेट (मुले व मुली) स्पर्धा पार पडल्या. क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी स्पर्धात्मकता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणांचा विकास झाला असून, महाविद्यालयीन परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर कबड्डी, खो-खो, रस्सीखेच, बुद्धिबळ, बॅडमिंटन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये मुला-मुलींनी खिलाडूवृत्ती, संघभावना आणि शिस्त यांचे उत्तम दर्शन घडविले. मॅरेथॉन स्पर्धा  तुपेवाडी रस्ता, पोलिस ठाण्याजवळ येथे घेण्यात आली, तर इतर सर्व स्पर्धा महाविद्यालयाच्या कॅम्पस-१ व माणदेशी ग्राउंड येथे पार पडल्या.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. वैशाली खाडे, प्रा. ए. ए. जाधव, डॉ. मीरा देठे, डॉ. बी. डी. जाधव  यांनी विशेष परिश्रम घेतले, तसेच प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी मार्गदर्शन केले.

छायाचित्र
MLV26B07334
दहिवडी : दहिवडी कॉलेज दहिवडीमध्ये आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवातील कबड्डी स्पर्धेतील एक क्षण. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com