

दहिवडीच्या नगराध्यक्षपदी वर्षाराणी सावंत विराजमान
सोनिया गोरे यांच्या हस्ते पदभार स्वीकारला; कार्यकर्त्यांसह शहरातून मिरवणूक
दहिवडी, ता. ६ : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या वर्षाराणी विलास सावंत आज विराजमान झाल्या. सोनिया गोरे यांच्या हस्ते त्यांनी पदभार स्वीकारला. या वेळी काढलेल्या जंगी मिरवणुकीत मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया दुपारी बारा वाजता झाली. पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी वर्षाराणी सावंत यांचा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज असल्याने त्यांचे नाव नगराध्यक्ष म्हणून जाहीर केले. या निवडणुकीचे कामकाज मुख्याधिकारी संदीप घार्गे यांच्यासह नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले.
या वेळी सोनिया गोरे यांचा नगरपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोनिया गोरे यांनी वर्षाराणी सावंत यांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी पदग्रहण केले. या वेळी नीलिमा जाधव, दिलीपराव जाधव, बाळासाहेब सावंत, अतुल जाधव, मारुती गलंडे, धनाजी जाधव, सिद्धार्थ गुंडगे, सतीश जाधव, महेश जाधव, रूपेश मोरे, अजित पवार, हणमंत गायकवाड, सयाजी मोरे, साईनाथ जाधव, महेश कदम, सूरज गुंडगे, किसन सावंत, स्वप्नील मोरे, रवी जाधव, किसन जाधव, नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडीनंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून आवाजाच्या भिंतींच्या साथीने, हलगीच्या गजरात शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सावंत यांना शुभेच्छा देण्यासाठी यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............
ग्रामविकासमंत्र्यांचा शब्द खरा
---
विलास ऊर्फ बाळासाहेब सावंत हे कित्येक वर्षे राष्ट्रवादीचे माण तालुकाध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी वर्षाराणी सावंत या राष्ट्रवादीकडून नगरपंचायतीची निवडणूक लढवून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी बाळासाहेब सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चार नगरसेवकांना सोबत घेऊन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यावेळी मंत्री गोरे यांनी वर्षाराणी सावंत यांना नगराध्यक्षपदाचा शब्द दिला होता. हा शब्द आज सत्यात उतरला. त्यामुळे बाळासाहेब सावंत यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये केलेले पक्षांतर फायदेशीर ठरल्याची चर्चा सुरू होती.
.......
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडीच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहीन. पती बाळासाहेब सावंत यांच्या सल्ल्याने सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन नगरपंचायतीला उंचीवर नेण्याचा प्रयत्न करेन.
- वर्षाराणी सावंत, नगराध्यक्षा, दहिवडी.
...........
छायाचित्र
MLV26B07342 & MLV26B07343
दहिवडी : सोनिया गोरे यांच्यासमवेत वर्षाराणी सावंत, बाळासाहेब सावंत, नीलम जाधव आदी. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
....... पुर्ण.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.