

दहिवडी पोलिसांची धडक कारवाई
एकाच दिवशी सहा ठिकाणी छापे; अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले
दहिवडी, ता. १५ : दहिवडी पोलिस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी एकाच दिवशी तब्बल सहा ठिकाणी धडक छापे टाकून कारवाई केली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहिवडी पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांना पूर्णपणे आळा घालण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पोलिसांनी एकाच दिवशी सहा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण सहा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यान्वये सहा स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच कारवाईदरम्यान एकूण ६,११२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत आणि दहिवडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये दुय्यम अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलिस उपनिरीक्षक रवी खाडे, प्रकाश हांगे, हवालदार बापू खांडेकर, पोलिस हवालदार प्रकाश खाडे, नंदकुमार खाडे, संतोष वीरकर, नितीन लोखंडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.