

चारा-पाण्याचा प्रश्न
खानदेशात सुटण्याची प्रतीक्षा
अॅग्रोवन वृत्तसेवा
धुळे ः यंदा कमी पावसामुळे अनेक भागांत पिकांची वाताहत झाली आहे. सध्या पाऊस नाही. खरिपातील पिकांची स्थिती काही भागांत बरी आहे. अनेक प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. मात्र, माळरानासह शिवारातील हिरवा चारा संपत आला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना यंदा चारा-पाण्याचा प्रश्न अडचणीत आणेल की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कमी पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन, मका, बाजरी व इतर पिके अनेक भागांत खराब झाली आहेत. मात्र, चारा हाती येईल, अशी स्थिती आहे. मागील वेळेस ओल्या दुष्काळामुळे शिवारातील पिके खराब झाली होती. फक्त चारा हाती आला होता. मात्र, रब्बी हंगाम बऱ्यापैकी आला होता आणि चाराही मुबलक होता. यंदा मात्र कमी पावसाने अडचणी निर्माण झाल्या आहेत. जून व ऑगस्टमधील कमी पावसामुळे विविध समस्या तयार झाल्या आहेत. शिवारातील चारा संपत आला आहे. पावसाचे पुनरागमन होईल की नाही, अशी स्थिती आहे.
साठविलेल्या चाऱ्याचा वापर
सध्या गोदाम किंवा गोठ्यात साठविलेला कोरडा चारा संपत आला आहे. कारण शिवारातील हिरवा चारा संपत आला आहे. पाण्याची समस्याही काही प्रमुख प्रकल्पांत जलसाठा पुरेसा असल्याने दूर होताना दिसत आहे. मात्र, चारा हाती येणार नाही, अशी भीती आहे. दिवसभरात गायीला सरासरी ४० किलो, तर म्हशीला सरासरी ५० किलो चारा लागतो. चाऱ्याचे दर आवाक्यात राहतील, अशी अपेक्षा आहे. पाऊस पुढे आल्यास मका, ज्वारी, सोयाबीन व तूर पिकांतूनही चारा उपलब्ध होईल, अशी स्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.