.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोमेश्वरनगर : दूध उत्पादकांना अनुदान देण्यासाठी राज्यसरकारकडून २६७ कोटी रूपये प्राप्त झाले असून अनुदान वाटपाची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. जसजसे प्रस्ताव प्राप्त होतील त्यानुसार ऑक्टोबरअखेरपर्यंतचे अनुदान वितरीत केले जाणार आहे. तसेच नोव्हेंबर महिन्याचे प्रस्तावही अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी महत्वपूर्ण माहिती राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली. यामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.