

The protesters have demanded immediate administrative action to remove the encroachment and reopen the road.
Sakal
वडगाव निंबाळकर : कोऱ्हाळे बुद्रुक ता. बारामती येथील गावठाणातील दलित वस्तीकडे जाणारा सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता अतिक्रमण करून बंद करण्यात आल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र पवार यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. रस्ता खुला होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.