हौशी पर्यटकाने अन्न शिजवण्यासाठी लावली आग अन्...

हौशी पर्यटकाने अन्न शिजवण्यासाठी लावली आग अन्...

माळशिरस : भुलेश्वर मंदीर परिसरातील वनविभागात दर्शनासाठी आलेल्या भाविक व पर्यटकाने लावलेल्या आगीने मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आगीत जळून राख झाल्याने वनविभाग व स्थानिक चिंतेत पडले आहे. भाविक व पर्यटकांनी निसर्गाचे,वनविभागाचे नुकसान होऊ नये म्हणून काळजी घ्यावी असे आवाहन वनविभाग व स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी लागून  असणार्‍या निसर्ग पर्यटन क्षेत्रात वनविभागाच्या हद्दीत पुण्यातील एका हौशी पर्यटकाने अन्न पदार्थ शिजवण्यासाठी लावलेल्या आगीने रूद्र रूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणावर वनविभागाचे क्षेत्र जळून खाक झाले होते. यामुळे या आगीत मोठ्या प्रमाणावर लहान मोठी झाडेही आगीच्या लोटात जळाल्याने वनविभागाने व निसर्ग प्रेमींनी हळहळ व्यक्त  केली. भाविक व पर्यटकांनी निसर्गाचे व  वनविभागाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे. 

'आपल्या संपत्तीप्रमाणे काळजी घ्यावी'- मंदीर भाविकांच्यासाठी खुले करण्यात आल्या नंतर मोठया संख्येने येणारया भाविकांनी व पर्यटकांनी आपल्या कृत्याने येथील निसर्गाच्या सौर्दयाला धोका पोचणार नाही याची काळजी घेत ती आपली घरची संपत्ती असल्याप्रमाणे संवर्धन करावे. असे सरपंच महादेव बोरावके यांनी सांगितले.

...कडक कारवाई करू- वनाधिकारी युवराज पाचरणे- जेजुरी वनमंडळ अधिकारी युवराज पाचरणे यांनी सांगितले की, कुठल्याही पर्यटकाने वनविभागाचे नुकसान केल्यास त्याची गय केली जाणार नसून कडक कारवाई केली जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com