Video : 'ते' सगळे गाढ झोपले होते...अचानक स्फोेट झाला अन्...

सुदाम बिडकर
Sunday, 7 June 2020

मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथे शनिवार रात्री साडेअकराच्या सुमारास फकीरा रंगनाथ मांदळे यांचे कौलारू घरास वीजेच्या शॉर्टसर्किटने आग लागून आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पारगाव : मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथे शनिवार रात्री साडेअकराच्या सुमारास फकीरा रंगनाथ मांदळे यांचे कौलारू घरास वीजेच्या शॉर्टसर्किटने आग लागून आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

संपूर्ण घर, घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे, भांडी, कपाट, खुर्च्या, दिवान, पंखा, कुलर, टिव्ही, टेबल तसेच दोन लाख रुपये रोकड व अंदाजे सोळा ते सतरा तोळे सोने आणि सर्व घर जळून खाक झाले आहे. दरम्यान, या दुर्घटनेत सुमारे 27 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील सर्वजण घराबाहेर ओट्यावर झोपले असल्याने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

दरम्यान, क्षणात आगीच्या ज्वालांनी घराला वेढले आतील सिलेंडरचा स्फोट झाला. तेव्हा हे सर्व गडबडून जागे झाले त्यांनी आरडा ओरड केला. आजूबाजूचे मदतीला धावून आले. पण तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी आज रविवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाला घटनास्थळी जाऊन तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले.

आपत्तीग्रस्त कुटूंबियांना जिल्हा परिषद व शासनाकडून सवतोपरी मदत केली जाईल, असे यावेळी वळसे पाटील यांनी सांगितले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रामदास पालेकर, शरद बँकचे संचालक अशोक आदक पाटील, विजय आदक, सरपंच कोंडीभाऊ आदक, माजी सरपंच बापू आदक, चिमाजी आदक, सुभाष बोत्रे, राजाराम मांदळे व ग्रामस्थ उपस्थित होते. घटनेचे वृत्त समजताच महसूल विभागाने घटनास्थळी जावून सदर घटनेचा पंचनामा केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to house due to fire caused by short circuit of electricity