बारामती : चारचाकीच्या काचा फोडून गाडीचे नुकसान 

मिलिंद संगई
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून त्या गाड्यांचे नुकसान करण्याचे लोण आता पुण्यानंतर बारामती पर्यंत येऊन पोहोचले आहे.

बारामती शहर : चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून त्या गाड्यांचे नुकसान करण्याचे लोण आता पुण्यानंतर बारामतीपर्यंत येऊन पोहोचले आहे .

बारामती शहरातील बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र भोईटे यांची डस्टर गाडी काल रात्री अज्ञात इसमांनी फोडली. या गाडीच्या सर्व काचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही समाजकंटकांनी हे काम केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.

आपली गाडी देशपांडे हॉस्पिटल नजीक पार्क करून सुरेंद्र भोईटे कुटुंबियांसह देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत आल्यानंतर त्यांना गाडीच्या काचा फोडल्या चा प्रकार लक्षात आला.

समोरची, पाठीमागची तसेच दोन्ही बाजूच्या चारही काचा जड वस्तूने प्रहार करून सोडण्यात आलेल्या आहेत. हा चोरीचा प्रयत्न होता की काही विकृत लोकांनी हे काम केले आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to the vehicle by tearing the glass in baramati