दामाजी नगर गटातील सदन पट्ट्यात जातीय समीकरणाचा प्रभाव कोण होणार सदस्य

दामाजी नगर गटातील सदन पट्ट्यात जातीय समीकरणाचा प्रभाव कोण होणार सदस्य

Published on

लोगो : दामाजीनगर जि.प. गट
---
PNE26V89179
महावीर ठेंगील
---
PNE26V89182
सिद्धेश्वर आवताडे
---
PNE26V89177
रमेश भांजे
---
PNE26V89173
सिद्धेश्वर दसाडे

गटातील सधन पट्ट्यात
जातीय समीकरणांचा प्रभाव
चौरंगी लढत; १५ उमेदवार रिंगणात
हुकूम मुलाणी : सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २३ तालुक्याच्या पूर्व भागातील सधन आणि ऊस उत्पादक पट्टा म्हणून ओळख असलेल्या, तसेच जातीय समीकरणांचा प्रभाव असलेल्या दामाजीनगर जिल्हा परिषद गटात यंदा चौरंगी पक्षीय लढत पाहायला मिळणार आहे. सध्या तब्बल १५ उमेदवार रिंगणात असले तरी, या बहुपदरी लढतीत मतदारांची पसंती कुणाला मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
यापूर्वी सर्वसाधारण प्रवर्ग असलेल्या या मतदारसंघातून बोराळे येथील नितीन नकाते यांनी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले होते. मात्र, यंदा हा गट ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने नव्या चेहऱ्यांची चर्चा सुरू झाली. सुरवातीला दामाजी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस पट्ट्यातून सर्वसमावेशक चेहरा म्हणून शिवानंद पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने आवताडे-परिचारक युतीकडून आवताडे समर्थक रमेश भांजे यांना संधी देण्यात आली.
रमेश भांजे यांनी २०१४ मध्ये प्रशांत परिचारक, तर २०१७ मध्ये स्व. भारत भालके यांच्यासोबत काम केले. मागील कार्यकाळात ते बोराळे गणातून काँग्रेसकडून पं.स. सदस्य होते. तब्बल नऊ वर्षांनंतर जि.प.साठी ते पुन्हा जनतेसमोर जात असून, आमदार समाधान आवताडे यांचे पाठबळ ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे.
त्यांच्या विरोधात तीर्थक्षेत्र आघाडीकडून महावीर ठेंगील रिंगणात आहेत. मुढवीचे माजी सरपंच म्हणून त्यांनी काम केले असून, शांत व मितभाषी स्वभाव ही त्यांची ओळख आहे. माजी जि.प. सदस्य स्व. शिवाजी ठेंगील यांचा वारसा आणि दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात यांचे पाठबळ असल्यामुळे तेही मजबूत उमेदवार मानले जात आहेत. या गटात त्यांच्या समाजाचे मतदार संख्येने अधिक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे आणि सुमैय्या तांबोळी रिंगणात असून, काँग्रेसकडून सिद्धेश्वर दसाडे निवडणूक लढवत आहेत. लिंगायत, मराठा आणि धनगर या प्रमुख तीन समाजांचे मतदार असलेल्या या गटात तिन्ही समाजांचे उमेदवार असल्याने लढत अधिक चुरशीची झाली आहे. याशिवाय रामचंद्र सलगर, अमोल गडदे, आमसिद्ध केदार, गणेश बेदरे, सूर्यकांत ठेंगील, अमोल टेळे आदी उमेदवारही मैदानात आहेत. दरम्यान, जि.प.साठी दाखल झालेल्या अर्जांपैकी पाच अर्ज छाननीत बाद झाले आहेत.
पं.स.च्या दामाजीनगर गणात हा मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यापूर्वी काँग्रेसच्या कल्पना गडदे यांनी येथे प्रतिनिधित्व केले असून, सध्या त्या आमदार समाधान आवताडे यांच्या गटात आहेत. यंदा ज्ञानेश्वरी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सविता शिंदे रिंगणात असून, भाजपकडून सविता कोकरे उमेदवार आहेत. तर अपक्ष म्हणून स्वप्नाली गडदे आणि जिजाबाई घोडके निवडणूक लढवत आहेत.
बोराळे पं.स. गणात राष्ट्रवादीकडून सुमैय्या तांबोळी, भाजपकडून जयश्री कवचाळे, आघाडीकडून अंबिका कवचाळे, तर काँग्रेसकडून शोभा म्हमाणे रिंगणात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राणी गावकरे, तसेच स्मिता म्हमाणे, सारिका धसाडे, रूपाली कोरे, तनुजा गावकरे, अलका पवार आदी उमेदवारही मैदानात असल्याने येथेही मोठी चुरस निर्माण झाली आहे. अर्ज माघारीनंतरच अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
---
दामाजीनगर गटातील गावे

- दामाजीनगर गण : दामाजीनगर, धर्मगाव, उचेठाण, बठाण, मुढवी, माचणूर, ब्रह्मपुरी, तामदर्डी, ढवळस.
- बोराळे गण : बोराळे, सिद्धापूर, अरळी, तांडोर, रहाटेवाडी, मुंढेवाडी, डोणज, नंदूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com