

सहा हजार महिलांचा दांडिया अन् फॅशन शो
१८ ऑक्टोबरला यशराज लॉन्समध्ये महोत्सव; ५ ऑक्टोबरला मोफत प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २ : दांडियाच्या तालावर सहा हजारांहून अधिक महिला-मुलींचा जल्लोष आणि त्यासोबत फॅशन शो... असा रंगतदार सोहळा सोलापुरात रंगणार आहे. जगदिश पाटील मित्र परिवार प्रतिष्ठानतर्फे १८ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता यशराज लॉन्स येथे दांडिया-गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व मुलींसाठी दांडिया-गरब्याचे मोफत प्रशिक्षण आणि कार्यक्रमाचा प्रवेशही विनामूल्य आहे.
मोफत प्रशिक्षण शिबिर सोमवारी (ता. ५) यशराज लॉन्स मंगल कार्यालय, जुनी मिल कंपाउंड येथे होणार आहे. मोनाली पागे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली बॅच सायंकाळी ४.३० ते ६, तर दुसरी बॅच सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत होईल. शिबिराचे उद्घाटन सोनिया गोरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. १८ ऑक्टोबरच्या मुख्य महोत्सवात दांडिया-गरबा स्पर्धा आणि फॅशन शो होईल. दांडिया-गरबा स्पर्धेसाठी आठ गट करण्यात आले असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
-----------------------
मान्यवरांची उपस्थिती
मुख्य कार्यक्रमाच्या उद्घटनास पालकमंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिकाधिक महिला व मुलींनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. माजी नगरसेवक जगदिश पाटील व मारवाडी युवा मंच महिला मिडटाऊन शाखेच्या अध्यक्षा निशा होलानी यांनी ही माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.