Khadakwasla Bridge water
sakal
किरकटवाडी - खडकवासल्यातील विद्यार्थी रोजच जीव धोक्यात घालून शाळेत जात आहेत. धरणामागील कालव्यावर असलेल्या अरुंद पुलावर सतत पाणी साचलेले असून, विद्यार्थ्यांना व नागरिकांना अक्षरशः कालव्याच्या भिंतीवरून पाय टाकत चालावे लागते. या जीवघेण्या परिस्थितीमुळे प्रत्येक पावलावर धोका आहे, आणि प्रशासनाकडून अद्याप काहीही उपाययोजना झालेली नाही.