

pune municipal election
esakal
पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीत एबी फॉर्म वाटप करताना झालेल्या गोंधळामुळे एकाच प्रभागात चौरंगी, पंचरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभागणी होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांना एकेका मतासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. २०२६ मध्ये नवीन प्रभागरचना असली तरी २०१७ तील निकालाची तुलना केल्यास २१ प्रभागांत एक हजारपेक्षा कमी मताने निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या २१ आहे.