Fursungi Power Issue: फुरसुंगी येथील गजानननगर परिसरात महावितरणच्या वीजवाहिन्या जमिनीलगत झुकल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या धोकादायक वाहिन्यांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असून लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.
फुरसुंगी : परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या वाहिन्या धोकादायक पद्धतीने जमिनीलगत आल्याने त्या सुस्थितीत करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. यावर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास कोणाच्या जिवावर बेतू शकते, असे नागरिकांकडून बोलले जात आहे.