
टाकळी हाजी : पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी व अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज या गावच्या सीमारेषेवर कुकडी नदीमध्ये जगप्रसिद्ध रांजणखळगे आहे. येथे मोठा पूल व त्यापासून खाली खोल असलेली दरी आहे. या दरीत रांजणाच्या आकाराचे असंख्य खळगे तयार झालेले आहे. पाण्याचा प्रवाह या खळग्यामध्ये पडून तो पुन्हा वर येऊन फेसाळत वाहत असतो. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. मात्र, सेल्फीच्या नादात पर्यटक पाण्यात जातात. येथे चार दिवसांपूर्वीच तरुणाचा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यूची घटना घडली. त्यामुळे येथे काळजी घेणे आवश्यक आहे.