Daring Robbery at Jewellers Shop on Manjari Mundhwa Road
sakal
मांजरी - सराफा दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडीच कोटी रुपयांचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह काही रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना येथील मुंढवा-मांजरी रस्त्यावरील म्हसोबा वस्ती येथे घडली आहे. आज पाहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.