Shirur Crime : शिरूर तालुक्यातील आंबळे गावात सशस्त्र चोरट्यांचा हैदोस, दांपत्याला मारहाण करीत पावणेदोन लाखाचा ऐवज लुटला

Village Robbery : शिरूर तालुक्यातील आंबळे गावात पहाटे सशस्त्र चोरट्यांनी घरात घुसून दांपत्याला मारहाण करत सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज लुटला.
Shirur Crime
Shirur CrimeSakal
Updated on

शिरूर : लोखंडी गजाने दरवाजा उचकटून घरात शिरलेल्या सशस्त्र चोरट्यांनी घरात झोपलेल्या दांपत्याला मारहाण करीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफूले व पैंजण ओरबाडून घेतले तर घरातील कपाटातील सोन्याच्या नथ आणि रोख २५ हजार रूपयांसह सुमारे पावणेदोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. आंबळे (ता. शिरूर) जवळील सोनखीळावस्ती येथे आज (ता. ६) पहाटे पावणेदोन च्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com