'पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये गोरखा रेजिमेंटचा तीर्थ पुन विजेता

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पहाटे सव्वापाच वाजता नामवंत धावपटूंचा सहभाग असलेल्या 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनला निशाण दाखविण्यात आले. स्पर्धेचा मार्ग आणि पहाटेचे थंड वातावरण स्पर्धकांना वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविण्यासाठी उपयुक्त ठरला.

पुणे : पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या. 'बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये गोरखा रेजिमेंटच्या तीर्थ पुन (22) यानं विजेतेपद पटकावलं. मान सिंग (45) दुसऱ्या तर, विक्रम बी (25) तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तीर्थनं 1 तास 5 मिनिटं 54 सेकंद, अशी वेळ नोंदवली. तर, मान सिंगनं 1 तास 7 मिनिटं 18 सेकंद वेळ नोंदवली. त्या पाठोपाठ विक्रमनं 1 तास 7 मिनिटं 50 सेकंदात मॅरेथॉन पूर्ण केली. 

आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी सक्रियतेचा संकल्प कृतीत उतरविण्याची प्रेरणा देण्यासाठी 'बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन'चं आज आयोजन करण्यात आलं होतं. सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या या मॅरेथॉनचं 'एपीजी रनिंग' या संस्थेनं संयोजन केलं होतं. यात तब्बल वीस हजार धावपटूंनी सहभाग घेतला. या धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मॅरेथॉन मार्गाच्या दुतर्फा परिसरातील नागरिकांसह विविध संस्थांनी गर्दी गेली होती.

म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पहाटे सव्वापाच वाजता नामवंत धावपटूंचा सहभाग असलेल्या 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनला निशाण दाखविण्यात आले. स्पर्धेचा मार्ग आणि पहाटेचे थंड वातावरण स्पर्धकांना वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविण्यासाठी उपयुक्त ठरला.  मुख्य शर्यतीसह पाच आणि दहा किलोमीटर शर्यतही आयोजित करण्यात आली होती. तसेच, फॅमिली मॅरेथॉनचंही आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेची ऑलिम्पियन धावपटू जॅनेट चेरोबोन-बॉक्कम स्पर्धेची "ब्रॅंड अँबेसिडर' होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: darjeeling Tirth Pun is champion in Bajaj Allianz Pune Half Marathon