Balasaheb Thorat
sakal
पुणे - ‘वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण आणि गुन्हेगारीमुळे आज पुण्याची काय अवस्था झाली आहे. भाजप सत्तेत आल्यास पुढे आणखी काय अवस्था होईल, याचा विचार करून पुणेकरांनी मतदान केले पाहिजे,’’ असे आवाहन ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
महापालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी थोरात पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.