esakal | मार्केट यार्डात दशेरी, चौसा आणि लंगडा आंबा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

man.jpg

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात उत्तर प्रदेशातील दशेरी, चौसा आणि लंगडा या आंब्यांचा हंगाम बहरला आहे.

मार्केट यार्डात दशेरी, चौसा आणि लंगडा आंबा दाखल

sakal_logo
By
प्रविण डोके

मार्केट यार्ड : गुलटेकडी येथील मार्केट यार्डात उत्तर प्रदेशातील दशेरी, चौसा आणि लंगडा या आंब्यांचा हंगाम बहरला आहे. चवीला गोड असणाऱ्या या आंब्यांना पावसाळयात मोठ्या प्रमाणात मागणी असते. रत्नागिरी हापूस आंबा संपल्यानंतर जुलै महिन्यात हा आंबा बाजारात दाखल होतो.

उत्तर प्रदेशातील बनरास येथून चौसा आंबा, इलाहाबाद येथून लंगडा आंबा तर मालियाबाद येथून दशेरी आंबा पुण्यातील मार्केट यार्डात येत आहे. जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने या आंब्याचा हंगाम असतो. सध्या बाजारात दररोज पाच किलोच्या साधारणतः १४००-१५०० बॉक्स तर १० किलोच्या १०००-१२०० लाकडी पेटी आवक होत असल्याची माहिती मार्केट यार्डातील आंब्याचे व्यापारी सलिम बागवान यांनी दिली.

या आंब्याला शहरासह, उपनगरातून मागणी आहे. तसेच सातारा, बारामती, इंदापूर, बिगवान, हुबळी या ठिकाणावरून ही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच हा आंबा पावसाळी असल्याने खराब नसतो व खाण्यास चांगला असल्याचे बागवान यांनी सांगितले.

 - किलो                - भाव दर्जानुसार
- पाच किलो बॉक्स -  ४००-६०० - मोठी साईज
- दहा किलो बॉक्स - ५००-७००  लहान साईज

(Edited by : Sagar Diliprao Shelar)