पुणे, मुंबईसह विविध शहरांत डेटा सेंटरची मागणी वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

- सीबीआरईच्या डेटा सेंटर्सचा (डीसी) निष्कर्ष

पुणे : पुणे, मुंबई, पुणे चेन्नई, बंगळुरु, कोलकाता, हैदराबाद या शहरांमध्ये वर्षभरात डेटा सेंटरची मागणी 40 टक्के वाढणार आहे. विविध धोरणात्मक उपक्रम, वाढती ग्राहक संख्या आणि डेटा स्टोरेजच्या वाढत्या कॉर्पोरेट गरजा या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेटतील सेवा आणि गुंतवणूक कंपनी सीबीआरईने डेटा सेंटर्स (डीसी) बाजारपेठेसंदर्भातील माहितीतील काही महत्त्वाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले. त्यात 2020 मध्ये या क्षेत्राला नव्याने आकार देणारे ट्रेंड्स अधोरेखित केले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या मुंबई 41 डेटा सेंटर्स क्षमतेसह आघाडीवर आहे. त्यामागोमाग बंगळुरु (17)आणि दिल्ली (16) या शहरांचा क्रमांक आहे. ऑनलाइन गेमिंग, ऑनलाइन एज्युकेशन, स्ट्रीमिंग, ई-कॉमर्स, एकूण इंटरनेट हिट्स अशा डिजिटल वापराच्या पद्धतींमध्ये वाढ होत असल्याने डीसी ऑपरेटर्सना डेटा सेंटर क्षेत्रात वाढ होणार आहे. त्यामुळे हायपरस्केलर्स आणि एंटरप्राइज क्लाएंट्सना सेवा देण्यासाठी त्यांना तातडीने त्यांच्या डीसी सुविधा वाढवाव्या लागतील, असे अपेक्षित आहे. त्यामुळे नव्या साइट निवडणे आणि आपल्या व्यवसायवृद्धीसाठी जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने सीबीआरईसोबत जोडले जाणे एंटरप्राइज सीआयओ आणि तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपन्यांना शक्य होणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशातील डेटा सेंटर बाजारपेठेबद्दल सीबीआरईचे देशातील अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन मॅगझीन म्हणाले, "चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या या युगात आम्ही भारतातील डेटा सेंटरच्या वृद्धीसाठी नियामक पातळीवरील पाठिंब्याची अपेक्षा करतो. राष्ट्रीय ई-कॉमर्स धोरण, पर्सनल डेटा कलेक्शन कायदा, डेटा सेंटर पार्क्ससंदर्भातील प्रस्तावित धोरण आणि सरकारच्या डिजिटल उपक्रमांमुळे ही मागणी वाढेल. डीसीला प्रतिष्ठित असा पायाभूत सुविधांचा दर्जा देण्याच्या प्रस्तामुळे जागतिक गुंतवणूकदारांचे त्याकडे लक्ष जाईल." 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डीसीमधील गुंतवणूक वाढण्याची शक्यता

जागतिक कंपन्या यापुढेही देशात गुंतवणूक करतील, असा सीबीआरईचा अंदाज आहे. 2020 मध्ये डीसी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या किंवा महत्त्वाच्या विकासकांना निधी पुरवण्यावर भर दिला जाईल. शिवाय, देशातील कोविड-19 ची स्थिती पाहता क्लाऊड आणि हायब्रिड आयटी पायाभूत सुविधांमध्ये कॉर्पोरेट्स अधिक गुंतवणूक करतील. 

ठराविक जागेऐवजी को-लोकेशन आणि क्लाऊड डीसीमध्ये रुपांतरण

जागा वापरणारे आता ठराविक डीसीऐवजी को-लोकेशन जागेची अधिक मागणी करतील. कारण, सध्या जगभरात असलेल्या संकटात थर्ड पार्टी डीसी अत्यावश्यक सेवा म्हणून सातत्यपूर्ण आणि विनाअडथळा सेवा देत आहेत. येत्या तिमाहीत डेटा स्टोरेज संदर्भात नियमनाची आवश्यकता पाहता सीबीआरईचा अंदाज आहे की, कॉर्पोरेट्स आता देशात त्यांच्या डीसी उत्पादनांचे पुर्नमुल्यांकन करण्याचा गांभीर्याने विचार करतील.

डीसी मागणी वाढण्यात ठोस योजनांचे पाठबळ

राष्ट्रीय ई-कॉमर्स धोरण आणि पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा यासारखी धोरणे देशातील ग्राहकांची माहिती देशातच राहण्यात हातभार लावेल. शिवाय, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी प्रकल्पासारखे मोठे, राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम डीसी मागणीमध्ये अधिक वृद्धी आणतील.

जागा वापरणाऱ्यांना लवचिकता असणारे स्केलेबल डीसी पर्याय हवे असतील जे कामकाजाच्या दृष्टीने आणि आर्थिकदृष्ट्याही सुयोग्य असतील. आम्ही सर्व आयटी धोरणांमधील सुयोग्य पद्धतींना एकत्र आणू शकतो आणि त्यातून जागेचा अधिकाधिक वापर करत  पायाभूत सुविधा उभ्या केल्या जातील. 

- राम चंदनानी, व्यवस्थापकीय संचालक ट्रान्झॅक्शन सर्विसेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Data Centers Demand will increase by 40 Percentage in Pune Mumbai and Other City